नाशिक/एनजीएन नेटवर्क
केंद्र सरकारच्या इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धेतील सर्वेक्षणात नाशिकमधील काठे गल्ली शाळा क्रमांक 43 चा डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. येत्या शनिवारी गोव्यात पुरस्कार सोहळा होणार असून नाशिक मनपा शिक्षण विभागाला रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे.
काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. 43 मध्ये आठ स्मार्ट पायलट क्लासरुम सुरु करण्यात आले. एक कोटी रुपयांचा निधी खर्च करुन शाळेला डिजीटल बनवत रुपडे पालटवण्यात आले. याची दखल केंद्र सरकारने घेवून शाळेचा सन्मान केला आहे. इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेक या संस्थेने ‘स्मार्ट स्कूल’ उपक्रमात सहभागी झालेल्या शहरांना भेटी दिल्या. या संस्थेच्या पथकाने काठे गल्ली शाळेला भेट देत डिजीटल स्कूलची पाहणी केली. या स्पर्धेत काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक देण्यात आला. येत्या पाच ऑगस्टला गोव्यात ‘गोव्हर्मेंट डिजिटल अवाॅर्ड 2023’ पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यास महापालिका शिक्षणाधिकारी बी.जी.पाटिल उपस्थित राहणार असून सन्मान स्विकारणार आहे.