नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाढत्या अवैध व्यवसाय विरोधात मोहीम छेडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गुटखा विक्री करणारे रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अभियान यशस्वितेसाठी आठ विशेष पथके तैनात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व चाळीस पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार यांचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यातील अवैध दारू निर्मितीची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी मुख्यालयाकडून चार महिला पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दरी, डोंगरात फिरत अवैध दारु निर्मितीचे अड्डे उध्दवस्त करण्यात आले. जिल्ह्यातील मटका , अंमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, अन्न भेसळ यासह सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायावर कारवाया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहचवावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी खबर ही हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.