NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशिक पोलिस सतर्क; झोपडपट्ट्यांसह गुन्हेगारांच्या घरांची झडती

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

शहरातील विविध भागात सुरु असलेले खून सत्र आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून शक्य ते उपाय केले जात आहेत. मध्यरात्री अचानक रस्त्यावर उतरत पोलिसांकडून झोपडपट्ट्यांसह गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या कारवाईत ४३ तडीपारांची तपासणी करण्यात आली. 

आठवडाभराच्या कारवाईत रात्रीच्या वेळी चौकाचौकात ठाण मांडणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी दणका दिला. ११२ जणांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस नोंदीतील आणि तडीपार गुन्हेगारांची यापुढेही वेळोवेळी तपासणी केली जाणार असून टवाळखोरांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले. यामध्ये नवीन नाशिकमधील सूरज शर्मा ( रा. महाकाली चौक, पवननगर) हा गुन्हेगार आढळून आला. शर्मा यास तडीपार करण्यात आले असतांनाही तो त्याच्या घरात मिळून आला. कुठलीही परवानगी न घेता तो शहरात वावरत असल्याचे दिसून आले. 

Leave A Reply

Your email address will not be published.