नाशिक : विकास पाटील
नाशिक ते पेठ गुजरात महामार्गाचे काही दिवसांपासून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून मात्र काम झाल्यावर दोन महिन्याच्या आतच सिमेंट काँक्रिटी करण्याच्या रस्त्याला भेगा पडल्या असून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
रस्त्यावर राऊ हॉटेल ते जकात नाका एवढ्याच परिसरात बऱ्याच ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला भेगा पडल्या असून महाराष्ट्र शासनाने या रस्त्याचे पेठ ते नाशिक या पट्ट्यात सततच्या पावसामुळे हा महामार्ग सतत खराब होत होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू केले होते मात्र या कायमस्वरूपी उपाय योजनेचा देखील भट्ट्याबोळ झालेला असून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून देखील ते वाया गेले का असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहत आहे
Comments are closed.