- २०० कोटींची गुंतवणूक करणार; इनडोअर, आउटडोअर सर्किट ब्रेकर्स उत्पादनाचे प्रमेय साधणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
विद्युतीकरण आणि ऑटोमेशन क्षेत्रात वैश्विक लौकिक राखून असलेल्या ‘एबीबी’ समूहाने भारतात अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तब्बल ६८० कोटींच्या या गुंतवणूक प्रक्रियेत नाशिकसह बंगळूरू, वडोदरा आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सदर गुंतवणूक मेट्रो रेल्वे, अक्षय ऊर्जा, डेटा सेन्टर्स आणि तत्सम पायाभूत विकास सुविधा क्षमता विस्तारासाठी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये सातपूर औद्योगिक वसाहतीत ‘एबीबी’चा प्रकल्प गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असून नव्या समीकरणात समूह नाशकात २०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
नाशिक प्रकल्पात अत्याधुनिक वीज उपकरणांचे निर्माण करण्यात येते, ज्यांना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध आहे. नाशिकचे औद्योगिक क्षेत्रातील महत्व लक्षात घेवून समूहाने पहिला ‘स्मार्ट’ प्रकल्प विकसित केला. भविष्यातील उत्पादन वाढीसाठी समूह नाशकात २०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. येथे गुंतवणूक करताना इनडोअर आणि नाशिक प्रकल्पात अत्याधुनिक वीज उपकरणांचे निर्माण करण्यात येते, ज्यांना जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध आहे. नाशिकचे औद्योगिक क्षेत्रातील महत्व लक्षात घेवून समूहाने पहिला ‘स्मार्ट’ प्रकल्प विकसित केला. भविष्यातील उत्पादन वाढीसाठी समूह नाशकात २०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. येथे गुंतवणूक करताना इनडोअर आणि आउटडोअर सर्किट ब्रेकर्स उत्पादनाचे प्रमेय समूहाने ठेवले आहे. बंगळूरू, वडोदरा आणि हैदराबाद येथील गुंतवणुकीचे प्रमाण अनुक्रमे ३१५ कोटी, ५५ कोटी आणि ११० कोटी इतके राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
.. म्हणून भारताला प्राधान्य
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोर्टन विरोड यांच्या माहितीनुसार, भारतात विक्री होत असलेल्या ‘एबीबी’ उत्पादनांपैकी ८५ टक्के उत्पादने स्थानिक स्तरावर निर्माण करण्यात येतात. भारतीय बाजारपेठ सर्वाधिक द्रुतगतीने विकसित असलेल्या बाजारपेठांपैकी एक असल्याने पायाभूत सुविधा उभारणीच्या दृष्टीने आम्ही तिला प्राधान्य देत आहोत. भारतात कंपनी अस्तित्वाला ७६ वर्षे पूर्ण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Comments are closed.