नाशिक/एनजीएन नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्या बदलीला अखेर मूर्त स्वरूप लाभले आहे. ताज्या माहितीनुसार, गंगाथरण डी यांची मुंबई महापालिकेचे सह आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी धुळे येथील जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसारीकडे, गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या नाशिक महापालिका आयुक्तपदी डॉ. ए. एन. करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.