नाशिक/एनजीएन नेटवर्क
गोविंद नगर येथील १८ वर्षीय सायकलपटू शिया शंकर ललवाणी हिने मलेशिया येथे घेण्यात आलेल्या एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केले. ज्युनियर गटात शिया हिने चौथा क्रमांक पटकावला. अवघ्या 120 मायक्रो सेकंद च्या फरकाने तिला कास्यपदक मिळण्यापासून वंचित राहावे लागले. नाशिक जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभाग घेणारी शिया ही पहिलीच खेळाडू आहे. शियाने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती.
शिया लहानपणापासूनच जिम्नॅस्टिक ,स्विमिंग ,मलखांब हे खेळ खेळत आली आहे. ट्रायथलॉन या स्पर्धेत देखील शियाने कामगिरी केली आहे. स्व. जसपाल सिंग बिर्दी हे नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल ट्रेनिंग शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरा दरम्यान शियाची सायकलिंगची आवड व नैपुण्य बघून जसपाल सरांनी शियाला सायकलिंग स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले. तिने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आयोजित एन. आर. एम. स्पर्धेपासून तिची सुरुवात झाली. त्यानंतर नांदेड येथे आयोजित ट्रायथलॉन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.2018 ते 2019 मध्ये एम.टी.बी. सायकल स्पर्धेत सहभाग घेतला. व नॅशनल एमटीबी सायकल स्पर्धेत कास्यपदक पटकाविले. खेलो इंडिया मध्ये शिया ची कामगिरी बघून निवड झाली व ४ वर्ष गुवाहाटी येथे ट्रेनिंग देण्यात आले.
2020 मध्ये बिकनेर येथे आयोजित सायकलिंग रोड रेस मध्ये कांस्यपदक पटकाविले . 2021 मध्ये जयपूर येथे घेण्यात आलेल्या ट्रॅक रेस मध्ये कास्यपदक पटकाविले. सियाने आत्तापर्यंत सात वेळा महाराष्ट्र (State) स्पर्धेत मेडल पटकाविले आहे. तसेच 2022 मध्ये आयोजित मिनी ओलंपिक स्पर्धेत एक रोप्य व एक सुवर्णपदक पटकाविले. दिल्ली येथे वीरेंद्र सर व सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग चे ट्रेनिंग घेतले . यावर्षीच्या एशियन ट्रॅक चॅम्पियनशिप साठी शिया ची निवड ही एक खरोखर अभिमानाची बाब आहे.