NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशकात डॉक्टरला ३६ लाखांना गंडा; ११ संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

औषध निर्मीती व्यवसायात गुंतवणुक करण्यास भाग पाडून भागीदारीत कच्चा माल मागवण्याच्या बहाण्याने शहरातील एका डॉक्टरला तब्बल ३६ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉ.सतिश बुधाजी जगताप (रा.गुलमोहर कॉलनी, डीजीपीनगर) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी राजू एंटरप्रायझेस नावाची फर्म सुरू करून भामट्यांनी हा डल्ला मारला. डॉ.जगताप यांचा विश्वास संपादन करून संशयितांनी मेंदूच्या विकारावरची काही औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी विक्री व्यवसायात नफा असल्याचे सांगून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. मे २०२१ ते २५ मे २०२२ दरम्यान डॉक्टरांनी शिवशक्ती चौक येथील आपल्या क्लिनीकमध्ये वेळोवेळी तब्बल ३६ लाखाची रक्कम संशयितांच्या स्वाधीन केली. कच्चा माल मागविण्याचा बहाणा करून संशयितांनी ही फसवणुक केली.

या संशयितांविरोधात गुन्हा..

दरम्यान, डॉ. जगताप यांच्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांनी शिवानी पाटील, सबेरे लाल, चंद्रावती सिंग, शुभम नामदेव, जयश्री शेठ, बिक्रम लिंबू, सुनिल बाल्मिक, जयप्रसाद तिवारी, संजय शर्मा, बिक्रम बंन्सल, अ‍ॅजेल एडवर्ड आणि राजू एंटरप्रायझेस संस्था या संशयितांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.