नाशिक : टॅली सोल्युशन्स ही जागतिक स्तरावर लघू आणि मध्यम उद्योगांसाठी नवनवीन उपाय शोधणारी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी आहे. कंपनीने संपूर्ण भारतील ‘एमएसएमई सन्मान’च्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्याची घोषणा केली. डीबीएस (डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेड) बँक आणि मायबिझद्वारे समर्थित टॅली एमएसएमई ऑनर्सच्या संपूर्ण भारतातील 100 एमएसएमईचा सन्मान करण्यात आला. नाशिकमधील प्रिसिजन इंस्ट्रुमेंटेशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने या वर्षी 19,000+ जागतिक नामांकनांमध्ये बाजी मारली.
व्यवसाय आणि उद्योजकांना राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी टॅली एमएसएमई ऑनर्स हा वार्षिक उपक्रम आहे. एमएसएमईंच्या तळागाळातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतींद्वारे विविधतेचा आणि सकारात्मक प्रभावांचा सन्मान केला जातो. अनेक नामांकित संस्थांकडूनही या उपक्रमाचे समर्थन केले जात असून, या वर्षी हा उपक्रम देशभरात पोहोचला आणि उन्नाव, आगरतळा, वापी, आसनसोल यांसारख्या दुर्गम आणि लहान भागातील व्यवसायांना सन्मानित केले आहे. शहरे, विभाग आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अनोळखी नायकांना खऱ्या अर्थाने सन्मानित करणे एमएसएमई ऑनर्स हे सर्वसमावेशक ओळखीचे व्यासपीठ असल्याचा हा खरा पुरावा आहे. हा सन्मान वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त दिला जातो आणि २५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या आणि वैध GSTIN असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतो.
प्रिसिजन इंस्ट्रुमेंटेशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे अरुण डोंगरे यांना ‘चॅम्पियन ऑफ कॉज’ श्रेणीत सन्मानित करण्यात आले आहे. अचूक कॅलिब्रेशन सेवांद्वारे उद्योगाची विश्वासार्हता कंपनी वाढविते. कौशल्य विकास आणि धर्मादाय योगदानातील त्यांचे समाज-केंद्रित उपक्रम सामाजिक कल्याणाचे संकल्प अधोरेखित करतात, अनुकरण करावे, असे कॉर्पोरेट नागरिकत्वाचे प्रदर्शन करतात आणि समुदायातील लवचिकता वाढवितात.
हा सन्मान ५ श्रेणींमध्ये देशातील चार झोन (पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण) मध्ये देण्यात आला:
● वंडर वुमन : ज्या महिलांनी आव्हानांवर मात करत व्यवसाय स्थापन करून भरभराट केली आणि या प्रक्रियेत इतरांना प्रेरणा दिली, त्यांना सन्मानित करणे.
● बिझनेस मेइस्ट्रो: ज्यांचे कौशल्य आणि लवचिकता महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करते व जे चिरंतर यशाचा पाया घालतात, अशा अनुभवी व्यावसायिकांना सन्मानित करणे.
● न्यू जेन आयकॉन : व्यवसाय क्षेत्रात गतिशील नेते म्हणून स्टार्टअप्सना हायलाइट करणे, जुन्या आव्हानांवर नवीन उपाय शोधणे आणि वाढीसाठी नवीन मार्ग तयार करणे.
● टेक ट्रान्सफॉर्मर: तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आघाडीवर असलेल्या आणि त्यांच्या कार्यात कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणण्यासाठी डिजिटल साधनांचा लाभ घेणाऱ्या व्यवसायांचा सन्मान करणे.
● चॅम्पियन ऑफ कॉज: एमएसएमईच्या जागतिक कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या, अधिक शाश्वत आणि समावेशक व्यवसाय वातावरणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चॅम्पियन्सचा गौरव करणे.