NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘नीट’ परीक्षेत नाशिकचा आशिष भराडिया दिव्‍यांग प्रवर्गातून देशातून पहिला

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट २०२३ परीक्षेत नाशिकच्‍या आशिष मिलिंद भराडिया याने ७२० पैकी ६९० गुण मिळवताना ९९.९५५ पर्सेंटाईलसह दिव्‍यांग प्रवर्गातून देशातून पहिला क्रमांक पटकावला. सदर परीक्षेचा निकाल मंगळवारीरात्री उशिरा नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे जाहीर केला आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एनटीएतर्फे गेल्‍या ७ मे रोजी देश व विदेशातील परीक्षा केंद्रांवर नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एन्ट्रन्स टेस्‍ट (नीट) २०२३ ही प्रवेश परीक्षा घेतली होती. नाशिकमध्येही या परीक्षेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला होता. उत्तरतालिका जाहीर करताना त्‍यानंतर अन्‍य प्रक्रिया पूर्ण करत एनटीएतर्फे मंगळवारी रात्री उशिरा ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत नाशिकचा आशिष मिलिंद भराडिया याने दिव्‍यांग प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय क्रमवारीत त्‍याचा ७२२ वा क्रमांक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.