नाशिक/एनजीएन नेटवर्क
‘नरेडको’ नाशिक च्या वतीने नवनिर्वाचित भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. शहर विकासाची भूमिका आग्रहीपणे मांडत नरेडको नाशिकच्या पदाधिकारी यांचेकडून, सिहंस्थ कुंभमेळा, रिंग रोड, निओ मेट्रो, आयटी पार्क, नाशिक महानगरपालिका बाबत येणाऱ्या अडचणी प्रामुख्याने मांडण्यात आल्या. यावर जाधव यांनी शहर विकासाची सर्वसमावेशक भूमिका राहणार याबाबत ग्वाही दिली.
सत्कारप्रसंगी उपस्थित अभय तातेड, अध्यक्ष व सचिव सुनील गवादे, भाजपा सरचिटणीस पवन भगूरकर, जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे, प्रशांत पाटील, अनंत हिरे, मयूर कपाटे, शशांक देशपांडे, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, नितीन सोनवणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.