नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
स्टेट बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर नंदकिशोर राजभोज आणि बोलठाण (ता. नांदगाव) येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे शिक्षक सुनील साबळे यांचा त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शासकीय विद्यानिकेतनच्या माजी सहाध्यायांकडून एका हृद्य समारंभात गौरव करण्यात आला.
राजभोज यांनी 40 वर्षे स्टेट बँकेत कॅशियर, असिस्टंट मॅनेजर. अ. जन. मॅनेजर अशा विविध पदांवर सेवा केली. या काळात त्यांना उत्कृष्ट सेवेचे पुरस्कार मिळाले. साबळे यांनी विज्ञान व क्रीडाशिक्षक म्हणून 34 वर्षे सेवा केली. एक उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
कार्यक्रमात दोघांबद्दल बाजीराव सोनवणे, नाना निकम, अनिल कुमावत, प्रताप जाधव यांनी गौरवपूर्ण भाषणे केली. राजभोज व साबळे यांनी त्यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी मधुकर भामरे, संजय देशमुख, नरेंद्र वालखडे, विश्वास पाटील, किशोर झोपे आदी उपस्थित होते.
Comments are closed.