त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नुतन विश्वस्त मंडळाची नावे आज जाहीर झाली आहे. कैलास वसंतराव घुले, रुपाली पंकज भुतडा, पुरुषोत्तम मधुकर कडलग, स्वप्निल दिलीप शेलार, मनोज विनायक थेटे, (पुरोहित संघ), सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल (मध्यान्ह पुजक) अशा सहा विश्वस्तांची नियुक्ती सहायक धर्मादाय आयुक्त नाशिक प्रादेशिक यांनी जाहीर केली आहे.
मंदिराशी निगडीत तीन पदसिध्द विश्वस्तांपैकी तिसरे विश्वस्त तुंगार मंडळींचा एक प्रतिनिधी पदसिध्द विश्वस्त असतो. तथापि तुंगार मंडळी ट्रस्ट मधील सभासदांचे अद्याप एकमत न झाल्याने विश्वस्तपदाचे नाव निश्चित झाले नाही. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर एकुण ९ विश्वस्त पदाचे विश्वस्त मंडळ असते. त्यात अध्यक्ष हे जिल्हा सत्र न्यायाधीश असतात. तर त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे पदसिध्द सचिव असतात. या दोन शासकीय प्रतिनिधी व्यतिरिक्त तीन विश्वस्त तिन्ही त्रिकाल पुजकांपैकी एक प्रतिनिधी विश्वस्त असतो. पुरोहित संघातर्फे जे पुरोहित संघाचे अध्यक्ष असतात त्यांचीच पदसिध्द विश्वस्तपदी नियुक्ती होत असते. तर तिसरे विश्वस्त तुंगार मंडळी ट्रस्टतर्फे विचार विनिमय करुन देवस्थान ट्रस्टवर पदसिध्द विश्वस्त म्हणुन नियुक्ती केली जाते.