NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गोटात; 7 आमदारांचा पाठिंबा

0

कोहिमा/एनजीएन नेटवर्क

एकीकडे महाराष्ट्रामध्ये झालेल्या या राजकीय भूकंपानंतर नागालँडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. नागालँडमध्ये निवडून आलेल्या सर्व 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पक्षामध्ये फूट पडली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आहेत. एवढच नाही तर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. तसेच पक्षाने आपली पक्षाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचंही निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे. नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं होतं. एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. या 7 आमदारांनीच आता अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.