NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘नाफेड’च्या अटी-शर्ती; ‘असा कांदा खरेदीणार, तसा नाही’ असा बॅनर..

0

 नाशिक/एनजीएन नेटवर्क 

जिल्ह्यात नाफेडने कांदा खरेदी करण्याबाबतच्या अटी आणि शर्तींचे बॅनर लावल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची  शक्यता आहे. 

नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी न करता केवळ बॅनर लावून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे करताना त्यात अटी शर्ती ठळकपणे समोर मांडल्या आहेत. त्यामुळे कुठलाही शेतकरी आपला कांदा घेऊन केंद्रावर विक्री करण्यास जाणार नाही.

काय आहेत  अटी-शर्ती?

  • प्रति हेक्टर 280 क्विंटल पेक्षा जास्त कांदा स्वीकारला जाणार नाही
  • दर्जेदार 45 मिमीच्या पुढचा चांगला कांदा चालेल
  • विळा लागलेला, पत्ती लागलेला, काजळी असलेला, रंग गेलेला, उन्हामुळे चट्टे पडलेला, आकार बिघडलेला, कोंब फुटलेला, गरम मऊ असलेला, बुरशीजन्य, वास येत असलेला, मुक्त बेले असलेला कांदा स्वीकारला जाणार नाही

देवळ्यात शेतकरी आक्रमक

दरम्यान, कांदा प्रश्नावरून देवळा बाजार समितीत शेतक-यांनी प्रहार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच रास्ता रोको आंदोलन केलं. जिल्ह्याधिका-यांनी नाफेडच्या दराप्रमाणे कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले असताना देवळा बाजार समितीत नाफेडचा एकही अधिकारी  फिरकला नाही. त्यामुळे शेतक-यांचा संताप अनावर झाला.

   

Leave A Reply

Your email address will not be published.