मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे (GIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) आणि अॅस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेडचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांना कीटकनाशक उत्पादक आणि फॉर्म्युलेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (PMFAI) द्वारे प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 19 व्या आंतरराष्ट्रीय पीक विज्ञान परिषद आणि प्रदर्शन (ICSCE दुबई 2024) दरम्यान PMFAI-SML वार्षिक ऍग्चेम पुरस्कार 2024 च्या पाचव्या पर्वात त्यांचा हा गौरव करण्यात आला.
1967 मध्ये स्थापन झालेली, PMFAI ही कृषी रसायन/कीटकनाशक उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणारी राष्ट्रीय संघटना आहे. 221 मोठे, मध्यम आणि लघु भारतीय कृषी रसायन उद्योग या संघटनेचे सदस्या आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार पीक संरक्षण उत्पादने पुरवणाऱ्या तंत्रज्ञानातील सुधारणा आणि नवकल्पनांचा सल्ला देऊन कृषी स्पर्धात्मकता वाढविण्याचे काम ही संघटना करते. PMFAI द्वारे 2018 मध्ये भारतीय कृषी रसायन उद्योगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी वार्षिक ऍग्चेम पुरस्कारांची स्थापना करण्यात आली.
नादिर गोदरेज यांना प्रदान करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या भारतीय कृषी रसायन उद्योगातील अतुलनीय योगदानाबद्दल आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय कृषी रसायन उद्योग आणि भारतीय कृषीच्या वाढीमध्ये योगदान देण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल देण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल श्री. गोदरेज यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “PMFAI कडून जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मला मनापासून अभिमान वाटतो. हा गौरव संपूर्ण टीमच्या सामूहिक समर्पणाचा आणि अथक प्रयत्नांचा उत्सव आहे. कृषी स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पीक संरक्षण उपाय देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि PMFAI च्या मिशनशी हे कार्य जुळणारे आहे. या सन्मानासाठी मी खरोखर आभारी आहे आणि आम्हाला येथे आणलेल्या सहयोगी प्रयत्नांमुळे प्रेरित आहे. ऍग्रोकेमिकल आणि सीडीएमओ क्षेत्रासाठी समूहाच्या वचनबद्धतेबद्दल, ते पुढे म्हणाले की, “नवीन शोध आणि कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी आमची अटूट बांधिलकी आमच्या संशोधन आणि विकास युनिट्सद्वारे दिसून येते. सहकार्याच्या सामर्थ्यावर आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी सक्रियपणे सहकार्य ठेवणे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यातून आम्ही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय देऊ शकतो. ही मान्यता कृषी क्षेत्रातील उत्कृष्टता आणि टिकाऊपणासाठी आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.” हा पुरस्कार केवळ आजीवन अतुलनीय योगदानाचा उत्सवच नाही तर गोदरेजच्या प्रगतीशील योगदानाचा दीर्घकाळ चाललेला वारसाही आहे.