NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मायटेक्स एक्स्पो २०२३ द्वारे मिळणार नवीन संधी – ललित गांधी

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे मायटेक्स एक्स्पो २०२३ प्रदर्शन येत्या ६ ते ९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान डोंगरे वस्तीगृह, गंगापूररोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र व राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना देणे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्यातील व देशातील व्यापारी, उद्योजक प्रदर्शनात सहभागी होणार असून इतर देशाचे कौन्सुलेट जनरल व प्रतिनिधी सहभागी होणार असून व्यापार उद्योग वाढीच्या दृष्टीने महत्वपूर्ण सामंजस्य करार होणार आहेत. व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगांच्या नवीन संधीसह विविध विषयावर सेमिनार होणार आहे. मायटेक्स  एक्स्पो २०२३ प्रदर्शनाला व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रातून अल्पावधीतच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मायटेक्स  एक्स्पो २०२३ द्वारे मिळणाऱ्या  नवीन संधी व व्यवसाय वृद्धीसाठी मायटेक्स  एक्स्पो २०२३त  व्यापारी, उद्योजक, कृषी प्रक्रिया उद्योजक व विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. 

अध्यक्ष ललित गांधी यांनी  व्यापारी, औद्योगीक, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर स्वातंत्र्यपूर्व काळापासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. उत्तर महाराष्ट्र शाखा सुवर्ण महोत्सव वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मायटेक्सपो २०२३ हा त्याचाच भाग असून मायटेक्सपो २०२३ या  ट्रेड फेअरच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगाला राज्य व देश, जागतिक पातळीवर प्रोत्साहन देण्याचे काम होणार असून या माध्यमातून नवीन व्यापार उद्योगांच्या संधी प्राप्त होणार आहे.  या एक्सपोमध्ये व्यापार, उद्योग, कृषी, उद्योग, बांधकाम, आयटी, शिक्षण ऑटोमोबाईल, गृहप्रकल्प, सोलार यासह विविध 15 हून अधिक क्षेत्रातील 300 स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहेत.  सदर एक्स्पो दरम्यान भारतातील इतर राज्यात कार्यरत असलेल्या विविध चेंबर्स, संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी तसेच इतर देशातील कौन्सुलेट यांना निमंत्रित करून उत्तर महाराष्ट्र विभागाचा व्यापार, उद्योग वाढावा यासाठी मायटेक्सपो २०२३ महत्वाचे ठरणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

व्यापारी, उद्योजक, कृषी प्रक्रिया उद्योजकांनी मोठ्या संख्येने मायटेक्स  एक्स्पो २०२३ प्रदर्शनात सहभागी होऊन आपला व्यापार, उद्योग वाढवावा, नवीन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन  महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उपाध्यक्ष नितीन बंग, शाखा चेअरमन संजय सोनवणे, कन्व्हेनेर सचिन शहा, को- कन्व्हेनेर मिलिंद राजपूत, व्हिनस वाणी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.