NGN News
Latest Marathi News

‘मविआ’ अस्तित्व धोक्यात ! कॉंग्रेस आंबेडकरांसोबत जाण्याच्या मूडमध्ये..

  • काँग्रेस शिष्टमंडळ आंबेडकर यांना भेटले

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला असून अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तथापि, राज्यात या निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. काँग्रेसचे 30 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी 10 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू वज्रमूठ बांधण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीसोबत युती करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. म्हणूनच मविआ चे अस्तित्व धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने यापूर्वीच मुंबईमध्ये महापालिकेच्या सर्व 227 जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे, मात्र समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी देखील काँग्रेसकडून सुरू आहे.  मुंबईत अनुसुचित जाती प्रवर्गातील 49 जागा आहेत, त्यामुळे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments are closed.