मुंबई/एनजीएन नेटवर्क
आगामी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईत खांदेपालट केली असून अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांना हटवून ही जबाबदारी आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पक्ष सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये वर्षा गायकवाड यांच्या नियुक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाधी सरकार असताना त्या मंत्रीपदावर होत्या. धारावीमधून त्या सातत्याने निवडून येत आहेत, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत.