सौरऊर्जेवरील उपकरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
लासलगाव : राकेश बोरा
पारंपरिक कांदा चाळीमुळे उष्णता, आर्द्रता व कीटकांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. ही समस्या लक्षात घेता सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेज संकल्पनेला प्राधान्य दिले जात आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी कांद्याबरोबरच इतर भाजीपाला व फळेही सुरक्षितपणे साठवू शकतील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
राज्य शासनाच्या सहकार पणन यांच्या निर्णयानुसार राज्यातील कांदा पिकाचे आयुष्य वाढवण्यासाठी कांदा स्टोरेज यावर कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत सदर बैठक संपन्न झाली. असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कोल्ड स्टोरेजमध्ये तापमान व आर्द्रतेचे नियंत्रण ठेवले जात असल्यामुळे उत्पादन जास्त दिवस टिकते. त्यामुळे शेतकरी बाजारभाव वाढेपर्यंत माल साठवून ठेवू शकतात आणि त्यामुळे त्यांना उत्पादनाचा चांगला दर मिळतो. या कोल्ड स्टोरेजची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते सौरऊर्जेवर कार्यरत आहे. यामुळे पारंपरिक विजेच्या खर्चात लक्षणीय बचत होते, आणि पर्यावरणपूरक पर्याय साकार होतो. खर्चिक दृष्टिकोनातूनही ही योजना अधिक फायदेशीर ठरणारी आहे.
शासनाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पारंपरिक साठवणूक पद्धतींचा त्याग करून या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. अशा प्रगत सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यास शेती अधिक शाश्वत आणि नफ्याची ठरू शकते, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.
बैठकीला राज्य कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, शेतकरी प्रतिनिधी दीपक पगार, कला बायोटेकचे पदाधिकारी, निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष (नवी दिल्ली) विकास सिंग, सेंट्रल वेअरहाऊसिंग कार्पोरेशनचे (गोदाम)कमांडर अजय जादु, आणि पणन मंडळ पुणेचे सदस्य सुहास काळे या बैठकीस उपस्थित होते
Comments are closed.