- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्य शासनाने प्रदूषणबाबत लॉंग टर्म प्लॅनिंग केला आहे. एअरनॉमिक्स आज इथे संकल्पना मांडली. एमपीसीबी चे नियम माझ्या खात्याकडून कडक करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक नाशिकसाठी ‘एअरोनॉमिक्स२०२५’ .अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. १) मंत्री मुंडे यांच्या उपस्थितीत गंगापूर रोड वरील हॉटेल पाल्म स्प्रिंग्स येथे करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की , मुंबईत बिल्डिंग बांधतात तिथं नियम पाळायला सांगितले. हायवे होतात तिथंही नियम पाळले जातात. नदीत पाणी सोडतात हे गंभीर आहे. शासन योजना आणत आहेत, परंतु लोकसहभाग असल्याशिवाय त्या यशस्वी होऊ शकत नाही. सिंहस्थ कुंभमेळा येतोय ,भरपूर विषय पर्यावरणाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणासह सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास मंत्री पंकजा यांनी व्यक्त केला.
—————————–
माझ्या खात्याकडेच कायम लक्ष
धनंजय मुंडे यांना खाते दिले नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता, आपण मी तिकडे बघत नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मी माझ्या खात्याकडे कायम लक्ष देऊन बघते. कृषी मंत्री म्हणून काही वर्षा पासून अडचणी येत आहेत. परंतु त्या खात्याला काही द्वोष देण्याचे कारण नाही. दौंड मध्ये दोन गटात झालेला वाद मिटविण्यासाठी तिथले राजकीय पदाधिकारी लक्ष घालत असल्याचेही मंत्री मुंडे यांनी सांगितले.
Comments are closed.