सातपूर/एनजीएन नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या संचलनानेही वेधले सर्वांचे लक्ष नाशिक- अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन( आयमा) चे ध्वजारोहण अध्यक्ष निखिल पाचाल यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रथमच भोसला स्कूल तसेच ग्लोबल व्हीजनच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथकासह संचलन तसेच शहीद जवानांच्या वीर मातांचा सत्कार आदी कार्यक्रम पार पडले.
देशाचा झपाटयाने विकास होत आहे.विकास दर सतत असाच वाढता राहिलयास भारत जगात नंबर एक होईल असा विश्वास आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केला. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यानी नाशिकच्या औद्योगिकसह विविध क्षेत्रात झालेल्या विकासाची माहिती दिली. आयमाचे सरचिटणिस ललित बूब यांनी आभार मानले.शहीद जवानांच्या वीर मातांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विवेक कुलकर्णी,आयमाचे माजी अध्यक्ष जे.आर.वाघ,एस.एस.आनंद, विवेक पाटील,एस.एस.बिरदी, राजेंद्र अहिरे, आयमाचे उपाधक्ष राजेद पानसरे, सुदर्शन डोंगरे, सचिव योगिता आहेर, गोविद झा,खजिनदार राजेंद्र कोठावदे,दिलीप वाघ,अजय यादव,प्रमोद वाघ,हर्षद बेळे, राधाकृष्ण नाइकवाडे,मनोज मुळे,संजय महाजन,विराज गडकरी, हेमत खोंड,भरत येवला,राहुल गांगुर्डे, जयंत पगार, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, विरल ठक्कर,करणसिंग पाटील, सुनील जाधव,धीरज वडनेरे,राजेंद्र वडनेरे,हेमंत राख,एन टी गाजरे, दिलीप पिंगळे आदींसह उद्योजक व विविध औद्योगिक संघटनांचे पतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यावेळी उद्योगनितीच्या मुखपृष्ठाचे पकाशन पांचाळ आणि बेळे यांच्या हस्ते झाले.