NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘मूड ऑफ दि नेशन’ सांगतोय, ‘हा’ नेता मोदींचा योग्य उत्तराधिकारी ..

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

इंडिया टुडे आणि सी वोटरचा मूड ऑफ दि नेशन हा सर्वे जाहीर झाला असून यानुसार, आता निवडणुका झाल्यातर एनडीए सरकार सत्तेवर येईल. मात्र, मागच्या वेळेपेक्षा यंदा कमी जागा त्यांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून काही राष्ट्रीय नेत्यांना जनतेने पसंत केल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरार्धात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वात योग्य नेते आहेत, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, अमित शहा हे पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात योग्य आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा क्रमांक लागतो. २६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले तर १५ टक्के लोकांनी नितीन गडकरींच्या बाजूने मतदान केले. मूड ऑफ दि नेशनच्या सर्वेक्षणातून असेही सिद्ध झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर ६३ टक्के लोक समाधानी आहेत. जानेवारी झालेल्या सर्वेक्षणात हीच टक्केवारी ७२ टक्के होती.

Leave A Reply

Your email address will not be published.