मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यात सर्वत्र मान्सून दाखल झाला असून हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबई जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यासंबंधी आयएमडी मुंबईकडून इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या तीव्र ते अतितीव्र सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल, असाही इशारा देण्यात आला आहे.