NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

प्रतीक्षा संपली.. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळमध्ये बरसला !

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

अखेर ज्याची आतुरतेने अवघे भारतीय वात पाहत होते, त्याची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.  भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा  करण्यात आली आहे. मान्सून आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. 

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात म्हणजेच देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज केरळमध्ये मान्सूनने धडक दिलीय. हवामान खात्याने तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचे राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे.  जवळपास एक आठवडा उशिराने मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.