NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशिकरोडला भामट्याचा माय-लेकांना दोन लाखांचा चुना; थम्बपॅड..

0

नाशिक रोड/एनजीएन नेटवर्क

बँक कर्मचारी असल्याचे भासवत बँक ऑफ बडोदा शाखेतून दोन लाख रुपये पळवल्याची धक्कादायक घटना येथील जेलरोड परिसरात घडली आहे. या प्रकरणात संबंधित भामट्याने मायलेकांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जेलरोड परिसरातील रहिवासी अंकुर लाटे हे आई लिलाबाई सोमनाथ लाटे यांच्यासोबत गेल्या गुरुवारी (दि. १५ ) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बँकेत गेले होते. जुना आशीर्वाद बस थांब्याजवळील बँक ऑफ बडोदा शाखेत दोन लाखांची रक्कम भरण्यासाठी गेले होते. अंकुरने दोन लाखांची रोकड बँकेच्या कॅशियरसमोर काउंटरवर ठेवली. त्याचवेळी बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत आलेल्या एका इसमाने अंकुरला थम्बपॅड आणण्यास सांगताच अंकुर बाजूला गेला आणि हीच संधी साधत अज्ञात व्यक्तीने कॅशियरसमोर ठेवलेली रोकड लंपास करत बँकेतून पलायन केले. काही क्षणात अंकुश परत येताच त्याला झाला प्रकार लक्षात आला. यावरुन बँकेत एकच खळबळ उडाली. लाटे माय-लेकाने बँकेच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर असा कोणताही कर्मचारी बँकेत कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.