नाशिक/एनजीएन नेटवर्क
देशात मोदींच्या नेतृत्वाला दुसरा पर्याय नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आगामी अधिवेशनात राज्याचे प्रश्न मांडणार असल्याचेही ते म्हणाले.
‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्त नाशकात आलेल्या पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही, चिंतेची बाब आहे. काही नेते अद्यापही आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याचे ते म्हणाले. अधिवेशनाच्या चहापानादरम्यान विरोधक चर्चेला तयार असतील तर चर्चा करणार. कारण चर्चा करुन सर्व प्रश्न सुटू शकतात, यावर माझा विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले.