भोपाळ/एनजीएन नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. पवारांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मते द्या असे म्हणत मोदींनी पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना शरद पवार यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? असा सवालच शरद पवार यांंनी उपस्थित केला आहे.
विरोधी पक्षाचे लोक एकत्र आलेत, ही गोष्ट काहींना पचत नाही. त्यामुळेच असे आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोलले पाहिजे याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे असे शरद पवार म्हणाले.
शिखर बँकेचा सदस्य नव्हतो
पंतप्रधान मोदी यांनी शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला मी कधी शिखर बँकेचा सदस्य नव्हतो. मी कधीच कर्ज घेतले नव्हते. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत योग्य आहे? इरिगेशनच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलं मात्र ते खरे नाही. पंतप्रधान यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेलेआहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेतले त्यांचे काही कारण नाही अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे.