** एनजीएन नेटवर्क
पायाभूत सुविधा, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, भारतमाला प्रकल्प, सागरमाला, समर्पित मालवाहू मार्गिका, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण, औद्योगिक मार्गिका, उडान-आरसीएस, भारत नेट, पर्वतमाला हे सर्व प्रकल्प या व्हिजनसाठी अतिशय मूलभूत आहेत. मध्यमवर्गीयांसाठी खूप काही केले जात आहे.
————
२०१४ मध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोडी सत्तेत आले, तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. आज आपण जगातल्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. पंतप्रधान मोदी यांनी हमी दिली की, येत्या पाच वर्षात देश जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल…हा दुर्दम्य विश्वास जनता सोबत असते तेव्हा निर्माण होतो. संपुर भारत मोदी यांच्या मागे उभा आहे. मोदी हे वसुधैव कुटुम्बकम् या वैश्विक सुत्राची पायाभरणी करतात तेव्हा , त्यांना जागतिक नेतृत्व खुणावत असते. अलीकडेच झालेल्या G- २० च्या अपूर्व यशामुळे मोदी हे वैश्विक नेते झाल्याचे बघायला मिळते.
रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासाच्या सर्व प्रकल्पांची आज जी अभूतपूर्व प्रगती झाली आहे, ती मोदी यांच्या सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्वाशिवाय आणि त्यांच्या दूरदृष्टीशिवाय कधीही शक्य झाली नसती. पंतप्रधानांनी ‘पीएम गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ जारी केला. पायाभूत सविधा क्षेत्राला अधिक ‘गती’ देऊन त्याद्वारे नव भारत उभारणीसाठी अधिक ‘शक्ती’ देण्यासाठी हा आराखडा आखण्यात आला. ‘आत्मनिर्भर भारताचा निर्धार हा त्याचेच प्रत्यंतर; खरेतर भारताच्या शताब्दीचा पाया आहे .
मागील नऊ वर्षात भारत हे जगातील आघाडीचे राष्ट्र बनले. त्यासाठी या नऊ वर्षात अनेक कठोर निर्णय घेतले गेले. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची तंतोतंत अमलबजावणी केली गेली. म्हणूनच आजचा भारत नवा भारत आहे. आता , अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न भव्य आणि विशाल आहे, ज्यामुळे भाताचे जागतिक स्थान विश्वगुरुचे असेल. येणार्या २५ वर्षात, म्हणजे भारत १०० वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनवण्याचे ध्येय मोदी यांचे आहे. पंतप्रधानांनी ‘पंच प्रण’ लक्ष्यांची रूपरेषा आखली आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आता ठरवले जात आहे. पायाभूत सुविधा, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, भारतमाला प्रकल्प, सागरमाला, समर्पित मालवाहू मार्गिका, राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण, औद्योगिक मार्गिका, उडान-आरसीएस, भारत नेट, पर्वतमाला हे सर्व प्रकल्प या व्हिजनसाठी अतिशय मूलभूत आहेत. मध्यमवर्गीयांसाठी खूप काही केले जात आहे. रेल्वे, रस्ते आणि दूरसंचार पायाभूत सुविधांचा सर्वाधिक लाभ मध्यमवर्गाला मिळतो. दरवर्षी १.५ कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. मेक इन इंडिया अॅपल आणि टेस्ला सारख्या कंपन्या भारतात येत आहेत.. गेल्या ६०-६५ वर्षांपासून गमावलेला सरकारवरील विश्वास आता परत येत आहे.
पूर्वी स्थानिक विकासासाठी भारत सरकारकडून ७० हजार कोटी रुपये जात असत. आज ही रक्कम तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. पूर्वी गरिबांच्या घरांसाठी नव्वद हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. आज ही रक्कम चौपट होऊन चार लाख कोटी पेक्षाही जास्त रक्कम गरिबांसाठी घर उभारण्याकरिता खर्च केले जात आहेत. पूर्वी गरिबांना युरिया स्वस्त मिळावा, जी युरियाची थैली जगभरातल्या काही बाजारात तीन हजार रुपयांना विकली जाते ती युरियाची थैली शेतकऱ्यांना तीनशे रुपयात मिळावी यासाठी देशाचे सरकार दहा लाख कोटी रुपये,देशाच्या शेतकऱ्यांसाठी युरिया अनुदानापोटी देत आहे. मुद्रा योजना वीस लाख कोटी त्यापेक्षाही जास्त रक्कम देशातल्या युवकांना स्व रोजगारासाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपला कारभार उभारण्यासाठी देण्यात आले आहेत.आठ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे, आठ कोटी लोकांनी व्यवसाय सुरु केला आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्येक व्यावसायिकाने एक किंवा दोन जणांना रोजगार पुरवला आहे. आठ- दहा कोटी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या मुद्रा योजनेतून लाभ घेणाऱ्या आठ कोटी नागरिकांचे राहिले आहे.
सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगांना सुमारे साडे तीन लाख कोटी रुपयांचे सहाय्य देत कोरोनाच्या संकट काळातही त्यांचा व्यवसाय बुडू दिला नाही, त्यांना तग धरता आला..वन रॅन्क , वन पेन्शन माझ्या देशातल्या जवानांचा एक सन्मानाचा विषय होता.सत्तर हजार कोटी रुपये देशाच्या तिजोरीतून आज पोहोचले आहेत. विश्व कर्मा जयंतीपासून विश्व कर्म योजनेला प्रारंभ होणार आहे. हाताने परंपरागत कौशल्य काम करणाऱ्याना या योजनेचा लाभ होईल.
–प्राप्तीकराची मर्याद वाढीने मध्यमवर्ग आनंदी
मध्यमवर्ग कुटुंबियांना जेव्हा प्राप्तीकराची मर्यादा २ लाखावरून ७ लाखापर्यंत वाढते, तेव्हा सर्वात मोठा लाभ पगारदार व मध्यम वर्गाला होतो. देशात मध्यमवर्ग या निर्णयामुळे आनंदी आहे. तंत्रविकासातील वेग प्रचंड आहे. २०१४ पूर्वी इंटरनेटचा डेटा अतिशय महाग होता आज सर्वात स्वस्त डेटा मिळत आहे ; प्रत्येक कुटुंबाचे पैसे वाचत आहेत. ५-जी ची सुरुवात केली, आणि जगात सर्वाधिक वेगाने ५ -जी ची अंमलबजावणी सुरू करणारा भारत आहे. ७०० पेक्षा अधिक जिल्ह्यांपर्यंत आता आम्ही पोहोचलो आणि आता ६- जी पण तयारी करतो आहोत. त्यासाठी कृती दल देखील स्थापन केले आहे.
जनशक्ती आणि जलशक्तीची ही ताकद भारताच्या पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. १८ हजार गावांपर्यंत वीज पोहोचवणे, जनधन बँक खाती उघडणे, मुलींसाठी शौचालय बनवणे, सगळी लक्ष्य वेळेच्या आधीच संपूर्ण शक्तिनिशी पूर्ण केली जातील. पीएम किसान सन्मान निधी मध्ये अडीच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले आहेत. जल जीवन मिशन, प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी पोहचवण्यासाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. आयुष्मान भारत योजना, गरिबाला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी जी पैशाची समस्या येत होती त्यातून गरिबाला मुक्त करण्यासाठी, त्याला औषधोपचार मिळावेत, आवश्यकता असल्यास त्याच्यावर शस्त्रक्रिया व्हावी, उत्तम रुग्णालयात व्हावी, त्याला आयुष्मान भारत योजने अंतर्गत 70 हजार कोटी रुपये खर्च करत आहोत.
– स्वप्नवत चांद्रमोहीम अवतरली
‘सब का साथ, सब का विकास, सबका विश्र्वास’ हा मंत्र घेऊन प्रारंभ झालेली मोदी यांची दमदार वाटचाल आता वसुधैव कुटुम्बकम् या वैश्विक सुत्रापर्यंत पोचली. याचसोबत, चांद्रयान या भारताच्या चंद्रविषयक मोहिमेपर्यंतची यशकथा म्हणजे , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय मनाला मिळवून दिलेला जबर आत्मविश्वास आहे. शेतकरी, शेतमजूर, गरीब, शोषित, पीडित, वंचित, दलित अशा सर्व घटकांना न्याय देत सुरु झालेल्या अनेक योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनतेला मिळालेला लाभ हे सारेच जनतेपुढे आहे. कोरोनाकालातील मोदीजींचे नियोजन हा या विकासपर्वातील त्यांच्या कार्यशैलीचे जागेपण आणि उदारता दर्शविणारे ठरले. वसुधैव कुटुम्बकम् या श्लोकाचा खरा अर्थ आपल्याला कोरोनाकालातील मानसिक आपत्तीने शिकविला. जी -२० परिषदेची मांडणी करताना मोदी यांनी हाच सिध्दांत जगासमोर मांडला.. तो अधिक व्यापक झाला.
(शब्दांकन :रघुनाथ पांडे, प्रदेशाध्यक्ष यांचे माध्यम प्रमुख)