मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे नेते आणि पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावरती निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
त्यानुसार लोकसभा निहाय मनसेच्या बैठकांना सुरुवात झाली आहे.
मनसे नेते लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. एका लोकसभेसाठी मनसेचे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार मनसे नेत्यांनी लोकसभा निहाय बैठकींना सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्याकडे पुण्याची, बाबू वागस्कर यांच्याकडे शिरूर, वसंत मोरे यांच्याकडे बारामतीची, अमेय खोपकर यांच्याकडे मावळची, बाळा नांदगावकर यांच्याकडे छत्रपती संभाजी नगरची, संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड, किशोर शिंदे यांच्याकडे नाशिक तर आमदार राजू पाटील यांच्याकडे कल्याण लोकसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.