सिन्नर/एनजीएन नेटवर्क
मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका मनसे नाशिक शहराचे माजी अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फोडला.
अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा संपवून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात असताना गोंदे टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली होती. यावेळी ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. त्याचा गोष्टीचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी हा टोल नाका फोडला.