येवला/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना वीस वर्षांपूर्वी येवल्यातील रस्तेही माहिती नव्हते. ते त्यांना मी दाखवले. सलग चार निवडणुकांत भुजबळ यांच्याबरोबर होतो. मात्र आता आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत रहणार आहोत. आजची सभा पुढील निवडणुकीवर परिणाम करणारी सभा होणार असून २०२४ च्या निवडणुकीत येवल्यात बदल होणार हे निश्चित असल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांनी येथे सांगितले.
आ. दराडे म्हणाले, शरद पवार यांची सभा दूरगामी परिमाण करणारी ठरणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा दराडे यांनी केला आहे. मतदारसंघात घोषणा होतात, मात्र कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.