नाशिक/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर ‘शरद पवार हे वडिलांसारखे असून अजितदादा भावासारखे आहेत’, असे वक्तव्य करणाऱ्या देवळालीच्या आ. सरोज आहिरे यांची भूमिका अखेर स्पष्ट झाली आहे.मतदारसंघातील विकासासाठी अजितदादांसोबत असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सहाही आमदार आता अजित पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोठी गर्दी केली आहे. याच स्वागतासाठी आ. सरोज आहिरे या देखील उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपली भूमिका जाहीर करू न शकणाऱ्या सरोज आहिरे आज अजित पवार यांच्या स्वागताला आल्याने आश्चर्य व्यक्तब करण्यात आले. यावेळी एबीपी माझाने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर करत अजित दादांसोबत असल्याचे सांगितले.