NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

आ. हिरामण खोसकर यांच्याकडून कावनई किल्ल्याची पाहणी 

0

घोटी/राहुल सुराणा

  इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याची गेल्या शुक्रवारी ( दि. २१ ) रोजी दुपारदरम्यान संथाlधारेने दरड कोसळली नागरिकांत भयबीत वातावरण निर्माण होवू नये यासाठी घटनेची माहिती आमदार हिरामण खोसकर यांना मिळताच अधिवेशनातून बाहेर पडत शनिवारी ( ता. २२ ) रोजी किल्ला परिसराची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधून वरिष्ठ पातळीवर दूरध्वनी वरून भुगर्भ विभागाला सूचना केल्या.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात अनेक गावे-वाड्यावस्त्या ह्या डोंगर माथ्यावर किंव्हा पायथ्याशी आसल्याने भविष्यात कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होवू नये याकरिता आमदार श्री. खोसकर यांनी भुगर्भ विभाग, जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन, पंचायत समिती अधिकाऱ्यांशी बोलत तातडीने आशा गाव वाड्या वस्त्यांवरील पाहणी करण्यात येवून सदर दरड कोसळल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची भरपाई तातडीने करून या परिसरात असलेल्या कुटुंबातील नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याच्या व तुमच्या माघे खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्थाव पाठवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान कावनई, वाकी ग्रामपंचायत मार्फत किल्ल्याची दुरुस्ती व कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन बाबतीत आमदार खोसकर यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर,गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, अँड.संदिप गुळवे,गोरख बोडके,ग्रामसेविका ज्योती केदारे, शिवाजी शिरसाठ, गोपाळ पाटील, सरपंच किसन कुंदे, खंडू परदेशी,सपन परदेशी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.