नाशिक – एनजीएन न्यूज नेटवर्क
रानवड पंचक्रोशीच्या वतीने चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन काकासाहेबनगर येथे करण्यात आले. रानवड व पंचक्रोशीतील सावरगाव, खडक माळेगाव, शिरवाडे वणी, पिंपळद, देवरगाव व दरसवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ व कै. बाळासाहेब(भाऊ) वाघ यांचे प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. डी. के. जगताप, शिवाजी पवार, दत्ता रायते, राजेंद्र टोपे, अशोक निफाडे व मा. अजिंक्य बाळासाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्याप्रसंगी रानवड पंचक्रोशीतील रामनाथ पानगव्हाणे, रमाकांत जाधव,संजय वाढवणे, प्रमोद वाघ, अशोक वाघ, दत्तात्रय रायते, तेजेंद्र वाघ, प्रवीण वाघ, सचिन वाघ, बाळासाहेब चव्हाण, भाऊराव कांगुणे, राकेश चव्हाण, निलेश निफाडे, मन्सूर पठाण, नेताजी वाघ, विलास वाघ, रावसाहेब रायते, माधव रायते व पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण ठोके यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments are closed.