मुंबई-नाशिक/एनजीएन नेटवर्क
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे ऑक्टोबर २०२३ महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या मायटेक्स एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण राज्यपाल रमेश बैस लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या हस्ते व महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाला चालना देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो २०२३ या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन दिनांक 6 ते 9 ऑक्टोबर 2023 दरम्यान डोंगरे वस्तीगृह, नाशिक येथे करण्यात येणार आहे. मायटेक्सपो या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाला राज्य व देश पातळीवर प्रोत्साहन देण्याचे काम होणार असून या माध्यमातून नवीन व्यापार उद्योग संधी प्राप्त होणार आहे, या एक्स्पोमध्ये व्यापार, कृषी, उद्योग, बांधकाम, आयटी, शिक्षण, गृह प्रकल्प यासह विविध 15 हून अधिक क्षेत्रातील 250 स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. या चार दिवसात विविध विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.
प्रदर्शन यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा, उत्तर महाराष्ट्र शाखा को चेअरमन संजय सोनवणे, कार्यकारीणी सदस्य संदीप भंडारी, व्हीनस वाणी, सुधाकर देशमुख, संजय राठी, आदींसह उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य परिश्रम घेत आहेत. या प्रदर्शनात उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योग शिक्षण यासह विविध क्षेत्रातील व्यापारी उद्योजकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात आले आहे.