नाशिक/एनजीएन नेटवर्क
बागलाण तालुक्यात सध्या स्थितीत सुरू असलेल्या जलजीवन मिशन च्या 112 गावंच्या पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या योजना भारत निर्माण किंवा मुख्यमंत्री पेयजल योजनासारख्या कुचकामी तर ठरणार नाही ना अशीच काहीशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाचा हा उपक्रम असुन संपुर्ण राज्यात जलजीवन मिशन वर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. नाशिक जिल्ह्यात सुद्धा सर्वच तालुक्यात या योजनांचे कामे सुरू असुन प्रत्येक तालुक्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने तक्रारी होत असल्याने सध्या जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग चांगलाच चर्चेत आला आहे. कधी नव्हे इतका निधी या विभागाला आल्याने लोकप्रतिनिधींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही नजरा या विभागाकडे वळल्या आहेत .यातुनच अनेक ठिकाणी तक्रारी झाल्याचे दिसुन येत आहे. आधीच या विभागला मोठ्या प्रमाणावर शाखा अभियंता, उपअभियंता यांची कमतरता असुन एका एका अभियंत्या कडे 4 ते5 तालुक्यांचा कारभार देण्यात आला आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता ही प्रभारी असल्याने या विभागला कामे जास्त आणि अधिकारी कमी अशी गत झाल्याने ठेकेदाराने नेमके कोणच्या मार्गदर्शनाने कामे करायचे हाच प्रश्न निर्माण झाला असुन दिड ते दोन महिन्यांपूर्वी या विभागाच्या शाखा अभियंत्यांची प्रशसकीय बदली झाल्यावर या विभागाला अनुभवी असा दुसरा अधिकारी मिळाला नसल्याने सध्यातरी मिशन जलजीवनची कामे थंडावली आहेत.
या विभागाला अनुभवी व पुर्णवेळ अधिकारी मिळावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देत मिशन जलजीवन सुरळीत करण्याची मागणी आता ग्रामपंचायतीच्या स्थानिक प्रतिनिधींकडून होत आहे. सद्यस्थितीत या विभागाचा कारभार ज्यांच्या कडे देण्यात आला आहे ते उपअभियंता ही परदेश दौऱ्यावर गेल्याने आता या विभागाचा हा काटेरी मुकुट कंत्राटी अभियंत्याना सांभाळावा लागत आहे.तर उपअभियंता पदाचा कारभार बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडे कार्यभार देण्यात आला असुन “मिशन जलजीवन” पुर्ण होणार की शासनाचा पैस्याचा अपव्यय होणार हे मार्च 2024 अखेरीस समजणार असले तरी सध्या स्थितीत बागलाणच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला पूर्णवेळ अनुभवी अधिकारीची गरज आहे .