NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

महापालिका निवडणुकीत ‘१०० प्लस’चे लक्ष्य.. प्रशांत जाधव यांचा निर्धार

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

भाजपसाठी प्रसंगी त्यागाची भुमिका स्विकारणारे दिवंगत नेते यांचा आदर्श डोळयापुढे ठेवून ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीचा फायदा घेत आपण पक्ष वाढीसाठी तरुणांच्या खांदयाला खांदा लावून काम करू असे प्रतिपादन भाजपाचे नविनिर्वाचित नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले. तसेच आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर टाकेलेला विश्वास सार्थ ठरवू असे ते भाजपा कार्यालयात त्यांच्या सत्कार समारंभास सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

       यावेळी व्यासपीठावर मावळते शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.राहुल ढिकले, माजी महापौर सतिष कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, पवन भगुरकर, सुनिल केदार, जगन पाटील, प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार, गोविंद बोरसे, काशिनाथ शिलेदार, विधानसभा निवडणूक प्रमुख राजेंद्र दराडे, अनिल भालेराव, अमित घुगे, महेश हिरे, संतोष नेरे, गायत्री जाधव आदी उपस्थित होते.

         प्रशांत जाधव आपल्या भाषणात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अहोरात्र कार्य करत आहेत व भारताला जगात विश्वगुरु बनविण्याचे कार्य करत आहेत त्यांचा आदर्श डोळया पुढे ठेवून पक्ष बांधणीसाठी अहोरात्र कार्य करू असे सांगून ते पुढे म्हणाले की नाशिक महानगर हा भाजपाचा बालेकिल्ला असून तो अभेद्य ठेवण्यासाठी येत्या महापालिका निवडूणकांमध्ये आपले उद्दिष्ट्य 100 प्लस चे असून आपण हे उध्दिष्ट नक्कीच पार पाडू तसेच 2024 च्या लोकसभा व विधानसभेतील ऐतिहासिक विजयासाठी आपण अहोरात्र कार्य करू असे ते म्हणाले. यासाठी आपण सर्व प्रकारच्या आघाडया व प्रकोष्ट यांची मजबूत बांधणी करून बूथ रचनेच्या माध्यमातून घरोघरी पोहण्याचा प्रयत्न करू व त्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन व आढावा बैठकांचे आयोजन करू.

              प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या त्यागातून उभा राहिलेला पक्ष आहे असे सांगून जन संघ ते आजचा भाजपा व या प्रवासातील विविध टप्यांवर झालेल्या घडामोडी व भाजपा पक्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या दादासाहेब वडनेरे, भिकचंद दोंदे, डॉ.दत्तात्रेय डोंगरे, बाळकृष्ण कुलकर्णी, दशरथ पटेल, बंडोपंत जोशी, दौलतराव हिरे, गणपत काठे, कांतीभाई पटेल, नितीन भाई जोशी, बिरजीचंदजी नहार, दौलतराव आहेर आदी दिवंगत नेत्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी विजय साने यांनी एक सामान्य कार्यकर्ता ते नाशिक महानगर अध्यक्ष पर्यंतचा प्रशांत जाधव यांचा प्रवास यावर मनोगत व्यक्त केले. तसेच आ.सीमा हिरे, आ.देवयानी फरांदे व आ.राहुल ढिकले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पर भाषणे केले.

                सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय पदावरुन बोलतांना गिरीष पालवे म्हणाले की संघटनात्मक कार्याचा प्रशांत जाधव यांना व्यापक अनुभव असून ते त्याच्या अनुभवाचा भविष्यात त्याच्या अध्यक्ष कारकिर्दीसाठी नक्कीच होईल असे सांगून आपण  त्यांच्या या कार्यकाळात सर्वतोपरी सहकार्य करू असे त्यांनी सांगून प्रशांत जाधव यांना त्यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गायत्री प्रशांत जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

              सुत्रसंचालन पवन भगूरकर, प्रास्ताविक जगन पाटील तर आभारप्रदर्शन सुनिल केदार यांनी मांडले. कार्यक्रमात मंडल अध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध प्रकोष्ठ आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.