NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

18 वर्षांखालील व्यक्तीकडे ‘स्टेअरिंग’ नको; ‘ या’ रकमेच्या दंडाची तरतूद

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

आरटीओ आता 18 वर्षांखालील मुलांसाठी म्हणजे अल्पवयीनांच्या वाहन चालवण्यावर करडी नजर ठेवणार आहे. आरटीओ अल्पवयीनांसाठीच्या जुन्या नियमाची नव्याने कठोरपणे अंमलबजावणी करेल. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार 18 वर्षांखालील व्यक्ती वाहन चालवताना पकडली गेल्यास तब्बल 25 हजारांच्या दंडाची तरतूद करण्यात आलीय. इतकच नाही तर पालकांना जेलची तरतूदही करण्यात आलीय.

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी वाहन चालवल्यास 25 हजारांचा दंड. वाहन चालक, मालक अथवा पालक यांना 3 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा. दंडात्मक कारवाई झाल्यास वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही किंवा 1 वर्षांपर्यंत वाहन नोंदणी रद्द होऊ शकते, त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवता येणार नाही. अल्पवयीन मुलं रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवतात  त्यामुळे वाहन चालवणाऱ्या मुलांनाच नाही तर रस्त्यावरील इतरांच्या जीवालाही धोका असतो. त्यामुळे या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहतूक नियमांनुसार, मोटार वाहन चालवण्याच्या वैध ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving Licence) अर्ज करण्याचे किमान वय 18 वर्षे आहे. पण हा नियम पाळला जात नसून खुलेआम उल्लंघन होत असतं. दुर्देवाने लहान मुल चालवत असलेल्या गाडीला अपघात झाल्यास, तुम्ही विम्यासाठीही दावाही करु शकत नाही. अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवत असेल, तर त्याला विम्याचे फायदे लागू होत नाहीत. 

Leave A Reply

Your email address will not be published.