नाशिक/एनजीएन नेटवर्क
घराच्या बाजूला राहणाऱ्या अल्पवयीन युवतीला गोड बोलून बोलावून घेत ज्येष्ठ नागरिकाने तिचा विनयभंग केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. याप्रकरणी युवतीच्या पालकांनी पोलीसांत तक्रार नोंदवल्यानंतर संबंधितास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रमेश बाबुराव कापसे (वय ७०) असे विनयभंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने घराच्या बाजूला राहणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. या प्रकाराबाबत युवतीने घरात माहिती दिल्यानंतर पालकांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून कापसे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत कापसे यास अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, या प्रकाराबद्दल परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या नातीच्या वयातील तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास कडक शिक्षा व्हायलाच हवी, अशी संतप्त भावना महिला वर्गाने व्यक्त केली आहे.