NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार; कोळसा भट्टीत जिवंत जाळले

0

जयपूर /एनजीएन नेटवर्क

देशाला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची चप्पल आणि हातातले कडे कोळसा भट्टीच्या बाहेर सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील कोळसा भट्टीत टाकून जाळून टाकला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरु करण्यात आला आहे. राजस्थानमधल्या भीलवाडा इथे ही दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी संशयावरुन चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

 प्राप्त माहितीनुसार, भीलवाडामधल्या कोटडी भाागातील नरसिंहपुरा गावात राहाणारी मृत मुलगी बुधवारी सकाळी आपल्या आईसह जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी जेवण बनवण्यासाठी मुलीची आई घरी परतली. पण संध्याकाळी उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि गावातील लोकांनी मुलीचा शोध सुरु केला. पण ती कुठेच सापडली नाही. मुलीचा शोध सुरु असताना गावातील काही लोकांना जंगलातील कोळसा भट्टी पेटत असलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर भट्टीबाहेर मुलीच्या हातातले कडे आणि तिची चप्पल आढळली. कालबेलिया समाजाने जंगलात चार-पाच भट्ट्या बनवल्या असून जंगलातील लाकूड तोडून ते या भट्ट्यांमध्ये टाकतात. यातली एकच भट्टी पेटत होती. संशय आल्याने गावकऱ्यांनी भट्टीतली लाकडे बाहेर काढली असता त्यांना धक्का बसला. भट्टीत काही हाडे सापडली. पोलिसांनी तपास सुरु केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.