मुंबई /एनजीएन नेटवर्क
धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना महिलांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबाबत राज्य महिला आयोगाने मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना खुलासा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्री गावित यांनी खुलासा सादर केला आहे.
आपण उपस्थित स्थानिक आदिवासी बांधवांना अहिराणी आणि त्यांच्या स्थानिक भाषेत संबोधन करत होतो, मात्र माझ्या वक्तव्याचा वृत्तवाहिन्यांकडून विपर्यास करण्यात आला. माझा उद्देश महिलांचा अपमान करणे नव्हता. माझ्याकडून या आधी सुध्दा कधीही महिलांचा अपमान होईल असे शब्द प्रयोग केले गेलेले नाहीत व यापुढेही केले जाणार नाहीत. मी समाजातील सर्व महिलांचा आदरच करत आलेलो आहे असे म्हटले आहे. तरी आपल्या वक्तव्यामुळे समाजातील कोणत्याही महिला वर्गास त्यांचा अपमान केला असे त्यांना वाटत असेल तर आपण त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो असे गावित यांनी म्हटले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली.