कनाशी/अनिल पवार
कृषि विभाग कळवण व कृषि केंद्र मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण तालुक्यातील मौजे निवाणे, दह्याने ,शिरसमनी, सकोरे, भुसणी व पाळे खुर्द या गावामध्ये मका पिकावरील लष्करी अळी विषयी जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण शास्त्रज्ञ विशाल चौधरी यांनी मका पिकामध्ये कामगंध सापळ्यांचे पद्धत प्रात्यक्षिक दाखवून लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले व उपविभागीय कृषि अधिकारी ,कळवण श्री अशोकराव दमाळे यांनी पक्षी थांब्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कृषि विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री अशोकराव दमाळे, तालुका कृषी अधिकारी सौ मीनल मस्के ,मंडळ कृषी अधिकारी श्री सीताराम पाखरे , कृषि पर्यवेक्षक नंदू चवरे , कलावती पवार व कृषिसहायक श्री शालिग्राम महाले , कैलास मोरे व शेतकरी उपस्थित होते.
————————-
लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास उपाययोजना :
१) पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांनी एकरी १० थांबे व ५ कामगंध सापळे लावावे.
२) जर प्रादुर्भाव १० टक्क्यांवर असेल तर मका पिक ३-४ पांनवर झाल्यावर त्यावर ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा १०००० पीपीएम ऑइल दोन मिली लि फवारणी घ्यावी.
३) पहिल्या फवारणीनंतर ५-६ दिवसांनी किंवा 18 ते वीस दिवसांनी इमामेकटिन बेंझोएट ५ टक्के एसजी ८ ग्रॅम/पंप/किंवा स्पिनोटोरंम ११.७ इसी ७ मिली/ पंप फवारणी घ्यावी.
२५- ३० दिवसांनी थायोमिथा क्झाम १२.६ टक्के सीजी अधिक लंम्बडा सहलोथ्रीन९.५ टक्के झेड सी ८ मिली/ पंप फवारणी घ्यावी.
४) त्यानंतर परत प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोअन्टीनिलीप्रोल १८.५ टक्के ६.५ मिली / पंप फवारणी घ्यावी, असा सल्ला विशाल गणेश चौधरी,विषय विशषज्ञ पिक संरक्षण शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव यांनी दिला आहे.