पंचवटी/एनजीएन नेटवर्क
भारतीय जनता पार्टी, नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाच्या वतीने पंचवटी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कच्छी लोहाना मंगल कार्यालय व सहकार महर्षी स्व.उत्तमराव ढिकले सार्वजिनक वाचनालय येथे आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी भाजप विधानसभा प्रभारी सुनील केदार, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक हेमंत आण्णा शेट्टी, प्रा.सरिता सोनवणे, उल्हास धनवटे, नथु देवरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे, भाजप मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, किरण महाराज सोनवणे, प्रविण भाटे, विशाल गोवर्धने, राहुल क्षीरसागर, राहुल राजपुरोहित, सुहास खालकर, भास्कर लोणारे, दिपक दहिकर, प्रकाश नागरे, मनोज हिरे, चौधरी काका आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल लोखंडे, राहुल गोवर्धने, पंकज वाणी, राहुल गोवर्धने, अविनाश भाटे, महेश बैरागी, जय मोजवती, सौरभ सोनवणे, राहुल ससाणे, प्रतिक गवळी, अजय धनवटे, अमोल परदेशी, ललित वाणी, रुपेश लासुरे, तुषार नाटकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक निकम यांनी केले तर आभार प्रविण भाटे यांनी मानले.