NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘मेनोपॉज’ पुस्तक कुटुंबातील सर्वांसाठी मार्गदर्शक : नितीन ठाकरे

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

‘ मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जीवनातील अपरिहार्य वळण असून त्याबद्दल जागृती होण्याची गरज आहे. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे तर कुटुंबातील सर्वांना मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस व बार कौन्सिलचे अध्यक्ष एड नितीन ठाकरे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका प्रा. वंदना जाधव रकिबे यांच्या ‘मेनोपॉज’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले, त्यावेळी ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वरांजली पिंगळे, भुजबळ नॉलेज सिटी मेटच्या विश्वस्त शेफाली भुजबळ, अशोका मेडीकव्हरच्या संचालिका अंकिता पारख, स्त्री रोग तज्ञ डॉ.निवेदिता पवार, डॉ. राजेंद्र बेदमुथा, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, हायकोर्ट न्यायाधीश वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अशोका हॉस्पिटलने सदर कार्यक्रम प्रायोजित केला होता.

आ.देवयानी फरांदे म्हणाल्या,हे पुस्तक सर्वांना उपयोगी ठरणार आहे. स्त्रिया स्वत:कडे दुर्लक्ष होते. मी नो पॉज या पुस्तकामुळे या विषयाची माहिती होईल. व कुटुंबातील घटक काळजी घेतील, असे त्या म्हणाल्या. आ. सीमा हिरे यांनी सांगितले की, वंदना रकिबे यांनी विविध क्षेत्रात प्रगती केली असून त्यांचा व्यासंग मोठा आहे. मेनोपॉज हे पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल, ते आवर्जून वाचावे. डॉ राजेंद्र बेदमुथा यांनी सांगितले की पन्नास वर्षे वय झाल्यावर जे बदल स्त्रीच्या शरीरात होतात ते केवळ औषधाने बरे होऊ शकत नाही. या काळात पतीने तिला आधार द्यायला हवा. मात्र भारतीय पुरुषात तशी मानसिकता नाही. त्यात बदल होण्यासाठी पुरुषांनी देखील हे पुस्तक वाचलं पाहिजे.’ असे ते म्हणाले.


मेटच्या विश्वस्त शेफाली भुजबळ म्हणाल्या, पन्नाशीनंतर मी पेंटिंग, लेखन सुरू केले. एम ई टी काम पाहत आहे. या काळात हसत खेळत जगणं महत्वाचे आहे. हे मी कुठे बोलत नाही. योग, स्वच्छता इ. द्वारे याद्वारे ही अवस्था सुसह्य होऊ शकते. काही छंद जोपासावे. डॉ. निवेदिता पवार म्हणाल्या, या पुस्तकात खूप छान माहिती दिली आहे. महिलांनी याबाबत इतर महिलांना मदत करावी, काळजी कशी घ्यावी असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. महिला साडी, लग्न, खरेदी यात लक्ष देतात मात्र महिलांनी वैद्यकीय तपासणी जरूर करून घ्यावी. पुरुषांना देखील ही अवस्था येते, त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.

लेखिका प्रा. वंदना रकिबे यांनी मनोगत व्यक्त करताना ऋतुचक्र समाप्ती हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील टप्पा. रजोदर्शन, प्रसूती व रजोनिवृत्ती हे तीन टप्पे स्त्रीच्या जीवनात येतात. अन्य टप्पे सर्वांना माहिती असतात. मेनोपॉजमधील बदल मात्र कोणाला माहिती नसतात. याबाबत मराठीत फारशी चर्चा किंवा लेखन आढळले नाही. पहिल्या दोन टप्प्यातील क्षण आनंददायी असतात. त्याकडे स्त्री व कुटुंबातील लोक सकारात्मक असतात. रजोनिवृत्ती होण्याच्या काळात होणारे मानसिक व शारीरिक बदल समस्यांना सामोरे जायला लावतात. कळत नकळत तुला काय झालंय एवढं अस कुटुंबातील व्यक्ती म्हणतात. त्या काळात तिला समजून घेतले पाहिजे. त्याचा प्रयत्न म्हणून हे पुस्तक लिहिले आहे, अशी माहिती लेखिकेने दिली.

त्या पुढे म्हणाल्या,’ सायकॉलॉजी विषयांतर्गत शोध निबंध लिहिला, त्यामुळे मी यावर लिहावे अशी शिफारस करण्यात आली त्यामुळे हे लेखन केले, त्यावर तज्ञ डॉक्टरांनी उत्तम मत व्यक्त केले त्याबद्दल समाधान वाटते.’वंदनाताई यांच्या वाटचालीवरील लघुपट यावेळी प्रदर्शित करण्यात आला.

प्रारंभी मेधा पाटील यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणारा एकपात्री कार्यक्रम सादर केला. डिओलॉजिस्ट डॉ स्मिता मालपुरे यांनी प्रास्ताविक केले.’मेनोपॉज हा आजार नसून ती एक अवस्था आहे. प्रा. वंदना रकिबे यांनी या विषयाचे सामाजिक मानसिक पदर या पुस्तकात उलगडले आहेत’असे डॉ. मालपुरे यांनी सांगितले. भूपाली देवरे यांनी फेसयोगा कार्यक्रम सादर केला. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले,तर उदय रकिबे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.