NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

मनसोक्त भिजण्याच्या स्मृतींना उजाळा.. ( प्रासंगिक/स्नेहा शिंपी )

0

** एनजीएन नेटवर्क

पून्हा ढग दाटून येतात., 
        पून्हा आठवणी जाग्या होतात. ….

ढग दाटून आल्यावर अनेकांच्या मनावर स्मृतींचा पाऊस हमखास होतो. पावसाची एक तरी आठवण प्रत्येकाच्या मनात घट्ट घर करून जपलेलेली असते.  पाऊस म्हटलं की, मनसोक्त भिजणे आलेच. त्याचबरोबर डोळ्यांसमोर दिसे….. गरमागरम चहा , कॉफी  कांदा भजी, आणि मिरची यांचा आस्वाद घेणे म्हणजे एक सूखद अनूभव असतो. पावसासोबत अनेक चांगल्या, गोड स्मृती ,आठवणी निगडीत असतातच. . मुसळधार पाऊसात इतरांप्रमाणेच मला ही भटकंती करायला खंप आवडते. पावसाळा मला नेहमीच शाळेच्या दिवसांची आठवण करुन देतो.  माझं घर आणि शाळेचा प्रवास हा शाळेच्या बसने व्हायचा. शाळेतून घरी येतांना मी खिडकीत जागा पकडून पाऊस न्याहळत असे.  भिजण्यासाठी मी कधीकधी बस चूकवून मस्त ओलं होणे पसंत करायची. घरच्यांनाही माहित असल्यास काही ओरडा बसत नसे. मैत्रींणीं सोबत कणिस खाण्यात एक वेगळीच मजा येते.  परततांना एकमेकींच्या अंगावर पाणी उडवणे, भिजणे खूपच छान होते.  नंतर सर्दीचा भयंकर त्रास ही सहन करत असू. मला पाऊस हवाहवासा वाटतो. पाऊस म्हणजे जणू काही जवळीक मैत्रीच .

पावसात होणारा चिखल आणि अंगावर नकळतपणे उडवलेले शिंतोंडे जरी फारसे आवडत नसले तरी त्यावेळेस प्रियच होते. शाळेतून येताना जवळ छत्री असूनही ती न उघडता मैत्रिणीच्या घोळक्यात भिजण्याची मजा निराळीच होती. मला वाटतं पाऊस न आवडणारे दुर्मिळच असतील. पावसाच्या पाण्यावर सोडलेल्या कागदाच्या होड्या आजही आठवतायं.  जेवढं पावसात भिजणं आवडतं तेवढेच खिडकीतून न्याहाळणं पण तितकेच आवडतं. आजही पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतो तसेच मुसळधार पावसात लाॅग ड्रायव्हला जाण्याचा आनंद लुटत असतो. यात काही वयाचे बंधन नसतेच.. आनंद महत्त्वाचा..असतो. आजही मुसळधार पावसा़त मनमुराद भिजण्याचा आनंद घेण्यात वेगळीच मजा वाटते .. आम्ही पावसाळ्यात मैत्रिणींसह मस्त पावसाळी सहलीसाठी जातो आणि मनासारखं जगण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतो ..

  • स्नेहा शिंपी

          नाशिक 

Leave A Reply

Your email address will not be published.