घोटी/राहुल सुराणा
कर्नाटक राज्यात जैन मुनी कामकुमारनंदी यांची झालेली हत्या अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याने संपूर्ण देश भरात जैन समाजाची तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने घोटी जैन प्रकोष्टच्या वतीने तहसीलदार अभिजित बारवकर, घोटी पोलीस ठानेच्या पोलीस निरीक्षक विनोद पाटील, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना निवेदन देण्यात आले.
करोडो रुपयांची संपत्ती सोडून देश व धर्म सेवेत आपले आयुष्य वेचणारे,अत्यंत सरळ स्वभावी व धर्माचे नित्याने कामकाज करणारे यांसह जैन समाजाची श्रद्धा असलेले कामकुमारनंदी यांची झालेली हत्याचे निषध व्यक्त करत निवेदन देण्यात आले.
यावेळी इगतपुरी तालुका जैन प्रकाष्टचे तालुकाध्यक्ष प्रफुल कूमट,उपाध्यक्ष दीपक पारख, जिल्हा उपाध्यक्ष दीपक बाफना,सचिव मयूर पहाडे,व्यापारी आघाडी प्रमुख अशोक पिचा,मनोज कर्नावट,मोंटू मेहता आदी पदाधिकारी उपस्थित होते.