निलेश गौतम
डांगसौंदाणे/एनजीएन नेटवर्क
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून राज्य शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. शासनाने सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी बागलाण मध्ये सुमारे अकराशे एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दररोज सुमारे 22 मेगा वॅट विजेची निर्मिती होणार आहे.या प्रकल्पामुळे बागलाण विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.
बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज मिळावी अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार दिलीप बोरसे यांनी केली होती. फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यानुसार शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात बागलाणची सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवड करण्यात आली आहे.त्यानुसार महसूल विभागाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 32 गावांमध्ये एकूण 50 ठिकाणी महसूलची सुमारे 1100 एकर जमीन 1 रुपये एकर नाममात्र दराने भाडेपट्ट्यावर देण्याचे आदेश दिले आहे. हा भाडे पट्टा 30 वर्षांसाठी असणार आहे.
@ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महसूल विभागाने अकराशे एकर क्षेत्र भाडे कराराने दिले असून जागेची मोजणी सुरू झाली आहे .मोजणी झाल्यानंतर प्रकल्प उभारणीस प्रारंभ होईल .या प्रकल्पामुळे संपुर्ण तालुक्याला शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल.
- सतीश बोंडे,कार्यकारी अभियंता ,. म.रा वि.वि. कंपनी
या गावांमध्ये होणार सौर ऊर्जा प्रकल्प …
अंतापूर ( 63.03 एकर क्षेत्र)
पठावे (12.11 )
भवाडे ( 9.76 )
रामतीर ( 7.41 )
नामपूर ( 2.47 )
ब्राम्हणगाव ( 9.01 )
अजमीर सौंदाणे ( 36.61 )
एकलहरे ( 11.14 )
नवेगाव ( 6.20)
मळगाव ( 0.49 )
आराई ( 60.13 )
राजपुरपांडे ( 31.30 )
नांदिन ( 9.06 )
राहुड ( 41.94 )
मुळाणे ( 11.09 )
भाक्षी ( 8.89 )
बोढरी ( 20.13 )
तळवाडे (81.81 )
देवपूर ( 19.44)
महड ( 25.74 )
मोराणे ( 18.23 )
मोरकुरे ( 84.38 )
भिलदर ( 100.00)
किकवारी खुर्द (100 .00)
वनोली ( 9.43 )
जाखोड ( 7.28 )
तरसाळी ( 58.18 )
पिंगळवाडे ( 24.71 )
मुंगसे ( 21.68 )
आव्हाटी ( 2.34 )
दसाणे ( 47.55 )
केरसाणे ( 50.96 )
@ बागलाण तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ ही शेतीवर अवलंबून आहे.त्यामुळे वीज ,पाणी ,रस्ते ,शेतमालाला भाव याची व्यवस्था असेल तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस .शेतकऱ्यांना रात्री पहाटे आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी घालावे लागत आहे.यासाठी बारा तास वीज मिळावी अशी जुनी मागणी आहे.मी देखील एक शेतकरी असून वेळोवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी देखील सकारात्मक विचार करून आज सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी 1100 एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
– दिलीप बोरसे ,आमदार ,बागलाण