** एनजीएन नेटवर्क
हल्लीच्या धावपळीच्या व धकाधकीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणंच जमत नाही तर योग साधना व ध्यानधारणेसाठी कुठून वेळ काढणार. .. खरं तर ध्यानधारणा करणे हे खूपच महत्वाचे असते आणि ही वेळ आपल्या स्वतःसाठीच आहे. आपलं आयुष्य हे घडय़ाळयाच्या काट्याप्रमाणे गतिमान असते. त्यामुळे आपलं शरीर व मन हे अधिक क्रियाशील व्हावं असं सतत वाटत असते.
दिवसेंदिवस कामाचा वाढता ताण व त्यातून निर्माण होणारा तणाव यासाठी मन व शरीर लवकर थकते. मनावरची मळभ दूर करण्यासाठी मन:शांती हवी असते आणि ती केवळ ध्यानधारणेने मिळते. हाच एक उत्तम पर्याय व मार्ग आहे. ध्यान लावणे फार अवघड नाही. वेळ मिळेल तेव्हा करता येण्यासारखे आहे. यासाठी कुठलेच बंधन नसले तरी एक वेळ निश्चित करून ती पाळल्यास ध्यानधारणेचा चांगला परिणाम मिळू शकतो. जमिनीवर उत्तर किंवा पुर्व दिशेकडे तोंड करून मांडी घालून शांत बसून , हात मांडीवर ठेवून , डोळे बंद करून शांतपणे हळूहळू खोल श्वास घ्यायचा व लक्ष श्वासावर केंद्रित करावे. साधारण पणे तीन ते चार मिनिटे असे करावे. ध्यान धारणेसाठी शांत वातावरण व एकाग्रतेची आवश्यकता असते. दोन प्रहारांच्या मीलनाचा काळ ध्यानधारणेसाठी उत्तम समजला जातो. जसे – रात्र व सुर्यादय यांच्यातिल प्रात:काळ , सकाळ, दुपारमधील मध्यान्ह इत्यादी .. परंतू सुर्यादयो पुर्वी चा काळ उत्तम समजला जातो. ध्यानधारणेच्या नियमित सरावामुळे मन:शांती लाभते , एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मिळते. आयुष्यातील ताण , तणाव दूर पळतो. मन व शरीर चांगले तर आरोग्य पण चांगलेच राहते. चेहर्यावर देखिल तेज येते , थकवा नाहीसा होतो व आपण प्रत्येक गोष्टीत तत्पर व क्रियाशील राहतो. म्हणूनच उत्तम आरोग्यासाठी ध्यान धारणा आवश्यक आहे.
* स्नेहा शिंपी
नाशिक