नाशिक रोड : एनजीएन न्यूज नेटवर्क
मनपा शाळा क्रमांक. 51,सिन्नर फाटा, नाशिक रोड येथे माझी भाजी व माझी भाकरी हा उपक्रम घेण्यात आला. आई कशा पद्धतीने स्वयंपाक तयार करते याचे निरीक्षण विद्यार्थी करत असतात. उदा. भाकरी व पोळ्या चे पीठ कसे मळायचे,पोळ्या कसे लाटतात, भाकरी कशी करावी तसेच भाजी तयार करतांना कोणता मसाला वापरला जातो याचे निरीक्षण विद्यार्थी करत असतो. यासाठी शाळेने वेगळीच संकल्पना राबविली.
विद्यार्थ्यांना ज्वारी, गहू, बाजरीचे पीठ तसेच अन्य साहित्य आणण्यास सांगितले गेले. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात चूल मांडण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यावर तवा ठेवून भाकरी व पोळ्या केल्या. विद्यार्थ्यांनी जेव्हा स्वतःच्या हाताने भाकरी व पोळ्या तयार केल्या त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद निर्माण झाला होता. आम्ही सुद्धा भाकरी व पोळ्या स्वतःच्या हाताने करू शकतो अशी त्यांची भावना निर्माण झाली. उपक्रमशील शिक्षक राहुल कोळी यांनी भाजीपाला उपलब्ध करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी फ्लावरची मिक्स भाजी तयार केली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील, शिक्षक चंद्रकांत गायकवाड, सुनील बोंडे, चिंतामण साबळे,मोतीलाल गायकवाड, निर्मला दिवटे,उजमा शेख यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.